न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ मार्च) :- क्रांतीज्याेती सावित्रीबाई फुले पुण्यतिथी चे औचित्य साधत पिंपरी चिंचवड युवक काँग्रेसच्या वतीने नुकतेच उप जिल्हाधिकारी पदाच्या स्पर्धा परिक्षेत राज्यात दुस-या आलेल्या कु. पुजा गायकवाड यांचा देहूरोड येथील निवासस्थानी जाऊन स्मृतीचिन्ह, पुष्पगुच्छ व मिठाई देऊन आई वडिलांसमवेत सन्मान करण्यात आला.
अडाणीपणाचा अंधार नाकारुन ज्ञानप्रकाशाला जीवनाचे ध्येय बनविण्या-या विद्यादेवतेला म्हणजेच क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृती दिनानिमित्त सावित्री ची गुणवंत लेक कु. पुजा गायकवाड (उपजिल्हाधिकारी, पुणे) यांचा प्रतिकुल परिस्थितीवर मात करत उत्तम यश संपादित केले आहे.
समाजापुढे व युवा पिढीसमोर एक नवा आदर्श व प्रेरणा दिल्याबद्दल पिपंरी चिंचवड शहर जिल्हा युवक काँग्रेस च्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला आहे, असे पिपंरी चिंचवड शहर जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांनी सांगितले.