न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ मार्च) :- शिवसेना संपर्कप्रमुख बाळाभाई कदम यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना नेते संजय राऊत यांच्या शुभ हस्ते सामनाच्या कार्यालयात क्लिक करून शिवशाही व्यापारीसंघाच्या ऑनलाईन सभासद नोंदणीचा प्रारंभ करण्यात आला.
यावेळी शिवसेना विधानसभा संपर्कप्रमुख तथा शिवशाही व्यापारीसंघ प्रदेश अध्यक्ष युवराज दाखले यांच्या कामाचे कौतुक करून, शिवशाही व्यापारीसंघाच्या पुढील विस्तारासाठी शुभेच्छा देऊन, युतीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी सुचना केल्या.
यावेळी शिवशाही व्यापारीसंघ प्रदेश अध्यक्ष युवराज दाखले, शिवसेना विधानसभा संपर्कप्रमुख केसरीनाथ पाटीत, प्रदेश उपाध्यक्ष गोरख पाटील, प्रदेश सचिव गणेश आहेर, प्रदिप दळवी आदी उपस्थित होते.












