- महाविकास आघाडीचे नेते अजितदादा, पटोले आणि आदित्य ठाकरेंचा वाल्हेकरवाडीत मेळावा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ फेब्रुवारी २०२३) :- चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडी कडून अभूतपूर्व एकीचे दर्शन घडत आहे. शहर ते राज्य पातळीवरील नेते पूर्ण ताकदीने चिंचवड विधानसभेची जागा जिंकण्यासाठी ताकदीने मैदानात उतरले आहेत. अजित दादा पवार सातत्याने शहरात येत आहेत. तर शिवसेना आणि काँग्रेस देखील त्यांच्या नेत्यांना घेऊन बैठका आयोजित करत आहे.
महाविकास आघाडीतील इतर अनेक पक्षांनी आपली उमेदवारी मागे घेत नाना काटे यांना समर्थन देत प्रचारात सक्रिय होण्याचा निश्चय केला आहे. चहूबाजूने महाविकास आघाडीची ही एकजूट नाना काटे यांना विजयाच्या उंबरठयावर घेऊन जाणारे ठरणार आहे.
शिवसेना पक्ष देखील या निवडणुकीत नाना काटे यांच्याच बरोबर असून स्वतः युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे चिंचवड मध्ये दाखल होत कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत. काँग्रेसचे फायर ब्रँड नेते नाना पटोले यांचे देखील या सभेत भाषण होणार आहे.
महाविकास आघाडीतील तीन प्रमुख पक्षांचे तीन प्रमुख नेते एकाच मंचावर येणार म्हटल्यावर महाराष्ट्रभर या विषयाची चर्चा रंगणार आहे. तसेच या तीन नेत्यांच्या भाषणामुळे चिंचवडमधील वातावरण देखील नाना का बाजूने अजून जास्त प्रमाणावर फिरू शकते. चिंचवड विधानसभा कोणत्याही परिस्थितीत जिंकायची असा संकल्प महाविकास आघाडीने केलेला दिसून येत आहे.
२०५ चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या प्रचाराकरिता राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, शिवसेना (उध्दव ठाकरे पक्षाचे) युवा नेते आदित्य ठाकरे यांचे पिंपरी चिंचवड शहरात आगमन होत आहे. शहरातील महाविकास आघाडीच्या प्रमुख नेते मंडळींच्या उपस्थितीत शुभम गार्डन, वाल्हेकरवाडी येथे साेमवारी (दि. १३) रोजी सकाळी ११:०० वाजता “महाविकास आघाडी संयुक्त मेळाव्याचे” आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याला नेते मंडळी संबोधित करणार आहेत.
















