- माथाडी कामगाराला मारहाण; पैसे घेऊनही वाढीव हप्त्याची डिमांड…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ फेब्रुवारी २०२३) :- माथाडी कामगार आणि एका व्यवसायिकाकडून खंडणी उकळण्याचा प्रकार वाकड परिसरात घडला आहे. तिघेजण आणि त्यांच्या साथीदारांनी दमदाटी करून पैशांची केली. तसेच काम करण्यास मज्जाव केला. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पहिली घटना वाकड येथील फिनिक्स मॉल, गेट नं.६ येथे (दि. ३१/०१/२०२३) दुपारी अडीचच्या सुमारास घडली. आरोपी व त्याचा साथीदार यांनी फिर्यादीचा माथाडी कामगार सुरेश कुसाळकर याला गाडी खाली करायला पैसे किती घेतले? असे विचारले. तेव्हा कुसाळकर याने ‘ मी पैसे घेतले नसुन ते पैसे आम्हाला माथाडी कामगार बोर्डातुन मिळतात’ असे सांगितले. त्यावेळी आरोपींनी माथाडी कामगारांना माल उचलण्यास प्रतिबंध केला. आरोपीने कामगार सुरेश कुसाळकर याच्या पॅटच्या डाव्या खिशातुन जबरदस्तीने दोन हजार रुपये काढुन घेतले. आरोपी त्यांना हातानी मारहाण करुन धमकी देऊन तेथुन निघुन गेले. फिर्यादी भारत सुनिल काशिद (वय २२ वर्षे, धंदा माथाडी कामगार, रा. मंगलमुर्ती वाडयाजवळ, गणेश पेठ, चिंचवडगांव) यांनी आरोपी मनोज पवार व त्याचे साथिदार यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. वाकड पोलिसांनी १३३/२०२३ भा.द.वि. कलम ३९२, ३२३, ५०४, ५०६ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
दुसरी घटना प्रेस्टीज प्रोलाईफ स्क्वेअर येथे घडली. काम सुरु असताना आरोपींनी फिर्यादीला जिवे मारण्याची धमकी दिली. त्यांच्याकडे पैशांची मागणी केली. फिर्यादीकडे दहा हजार रुपये मागीतले. फिर्यादीने आरोपींच्या धमकीला घाबरुन गुगल पेवर एकूण दहा हजार रूपये पाठविले. त्यानंतर देखील आरोपींनी फिर्यादीकडे हफ्ता वाढवुन मागतिला. हा प्रकार नोव्हेंबर २०२२ ते जानेवारी २०२३ पर्यंत सुरु होता. फिर्यादी संतोष रंगराव चव्हाण (वय ४० वर्षे, धंदा व्यवसाय, रा. दक्षता नगर, बिल्डींग नंबर ५, फ्लॅट नंबर ४०४, कस्पटे वस्ती, वाकड) यांनी आरोपी अक्षय काशिद, प्रविण यादव (पुर्णनाव पत्ता माहित नाही) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. वाकड पोलिसांनी १३९/२०२३भा. दं. वि. कलम ३८६, ३८५, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
















