न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ फेब्रुवारी २०२३) :- एमआयडीसी भोसरी येथील कंपनीसमोरील सार्वजनिक रस्त्यावरुन फिर्यादी पायी चालत जात होते. त्यावेळी आरोपी दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी व्यक्तींनी फिर्यादीला हाताने मारहाण केली. कोयत्याचा धाक दाखवुन, कोयत्याच्या उलट्या बाजुने डाव्या पायावर मारुन दुखापत केली. फिर्यादीचा १५,००० रूपये किंमतीचा विवो कंपनीचा मोबाईल फोन व ५००० रोख रक्कम जबरदस्तीने हिसकावुन चोरुन नेली आहे, असे फिर्यादीत नमूद आहे.
हा प्रकार (दि. १०) सकाळी ६.०० वाजेच्या सुमारास एस ब्लॉक येथील ज्वाला कंपनीसमोरील रस्त्यावर घडला. हेम नारायण मनंधर (वय ३९ वर्षे, धंदा नोकरी, रा. भाड्याने, हनुमान मंदिराजवळ, गुळवेवस्ती भोसरी, मुळ रा. चापाकोट नगरपालिका, सेंगझार) यांनी आरोपी दोन अनोळखी व्यक्तींविरोधात फिर्याद दिली आहे.
भोसरी एमआयडीसी पोलिसांनी ५०/२०२३ भा.द.वि कलम ३९४, ३२३, ३४ आर्म अॅक्ट क ४ (२५) सह म.पो. अधि कलम १३५ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
















