न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ फेब्रुवारी २०२३) :- हिंजवडी येथील डान्स स्टुडीओत झालेल्या किरकोळ कारणांवरुन वाद घालुन आरोपीने फिर्यादीच्या स्टुडिओमधील केबिन, साऊंड सिस्टीम व आरसे फोडले. फिर्यादीच्या मनास लज्जा उत्पन्न केली. फिर्यादीला शिवीगाळ करीत जबरदस्तीने फिर्यादीची मान पकडली. त्यांना जवळ घेवुन ‘तुझ्यासारख्या लईजनी फिरवल्या आहेत’ असे म्हणत जोरात धक्का देवुन त्यांना ढकलुन दिले. फिर्यादीचे पती व पार्टनर हे मध्ये आले असता त्यांना जीवे मारण्याची धमकी देत वाईट वाईट शिवीगाळ केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार (दि. १०) रोजी रात्री ९.०० वाजेच्या सुमारास डान्स स्टुडिओ, डांगे चौक, वाकड येथे घडला.
महिला फिर्यादीने आरोपी रोहन संजय धुमाळ (वय २२ वर्षे, रा. विठ्ठल रुक्मीनी मंदिराच्या पाठिमागे, धुमाळवाडी, घोटावडे, मुळशी) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. वाकड पोलिसांनी १३२/२०२३ भादवि कलम ३५४,४२७,५०४, ५०६ अन्वये (दि. ११) रोजी गुन्हा दाखल केला आहे.
















