न्यूज पीसीएमसी नेटवर्क ‘
पिंपरी (दि. १३ फेब्रुवारी २०२३) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या क्रीडा कला विकास प्रकल्प कबड्डी संघातील कु. मनीषा राठोड, भूमिका गोरे आणि प्रतीक्षा लांडगे यांची मध्य प्रदेश येथील इंदोर येथे पाचव्या खेलो इंडिया राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली होती.
(दि. ५/१/२०२३ ते ९/१/२०२३) दरम्यान मध्य प्रदेश येथे संपन्न झालेल्या पाचव्या राष्ट्रीय खेलो इंडिया राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत ते उपविजयी झाले आहेत. त्यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे नाव (कबड्डी) क्रीडा क्षेत्रामध्ये देशपातळीवर चमकविल्याबद्दल अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी सहाय्यक आयुक्त बाळासाहेब खांडेकर, उप आयुक्त विठ्ठल जोशी, उप आयुक्त रविकिरण घोडके, सहाय्यक आयुक्त सुषमा शिंदे, क्रीडा अधिकारी अनिता केदारी, क्रीडा पर्यवेक्षक दीपक कन्हेरे, जनसंपर्कचे प्रफुल्ल पुराणिक उपस्थित होते .
कु. मनीषा, भूमिका, प्रतीक्षा या खेळाडूंसह त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या बन्सी आटवे यांचा सत्कार करण्यात आला. या संघाला बाळासाहेब राठोड मुख्याध्यापक माध्यमिक विद्यालय थेरगाव, सोनाली जाधव मॅडम, गोपीचंद करंडे यांचे सहकार्य लाभले आहे.


















