न्यूज पीसीएमसी नेटवर्क ‘
पिंपरी (दि. १३ फेब्रुवारी २०२३) :- पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, दिवाणी व फोजदारी न्यायालय पिंपरी आणि पिंपरी-चिंचवड अॅडव्होकेट्स बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (दि. ११) लोकन्यालयाचे आयोजन करण्यात आले होते.
पिंपरी न्यायालयात घेण्यात आलेल्या लोक न्यायालयात २५८ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. पॅनल जज म्हणून पिंपरी न्यायालयातील अॅड. पूजा दळवी, अॅड. योगिता टपळे, अॅड. अक्षय शिंपी तर आकुर्डी न्यायालयात अॅड. नाझिया मोमीन यांनी काम पाहिले.
याप्रसंगी ज्येष्ठ विधिज्ञ अॅड बबन ठोंबरे, अॅड. पवन गायकवाड, अॅड. पद्मावती पाटील, अॅड. विजय शिंदे, अॅड. रवि बचुटे, प्रथमवर्ग दिवाणी व फोजदारी न्यायाधीश आर. एस. वानखेडे, पिंपरी-चिंचवड अॅडव्होकेट्स बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. नारायण रसाळ, उपाध्यक्ष अॅड. जयश्री कुटे, सचिव अॅड. गणेश शिंदे, महिला सचिव अॅड. प्रमिला गाडे, सहसचिव अॅड मंगेश नडे, खजिनदार अॅड. विश्वेश्वर काळजे, हिशोब तपासणीस अॅड. राजेश रणपिसे, सदस्य अॅड. अक्षय केदार, अॅड. स्वप्नील वाकुंज, अॅड. सौरभ जगताप, अॅड. नितीन पवार आदी उपस्थित होते.
लोक न्यायालयामध्ये वेगवेगळी २५८ प्रकरणे मांडण्यात आली. या सर्व प्रकरणांचा एक दिवसात निपटारा करण्यात आला. अनेक महिने लागणारी प्रकरणे लोक न्यायालयात सामंजस्याने मिटवली गेल्याने दोन्ही पक्षांना या लोक न्यायालयाचा दिलासा मिळाला.
सूत्रसंचालन अॅड. प्रमिला गाडे यांनी तर अॅड. अक्षय केदार यांनी आभार मानले.
















