न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ फेब्रुवारी २०२३) :- मुलाला दारुचे व्यसन आहे. त्यासाठी तो कुटुंबियांकडे पैशांची मागणी करीत होता. फिर्यादी या आरोपी मुलाच्या आई आहेत. आरोपीने वडिलांच्या नावे असलेले घर स्वतःच्या नावावर करण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकला. आरोपीच्या व्यसनाधिनतेमुळे त्यांनी नकार दिला होता. त्या रागातुन आरोपीने वडिलांना “तु जिवंत राहिलास तर मला घर मिळणार नाही, त्यामुळं तुझा आज शेवटच करतो” असे बोलून त्यांना जिवे मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या लघवीच्या जागेवर लाथ मारून त्यांना जखमी केले. त्यात ते बेशुध्द पडले. आरोपीने त्यांना ब्लेडने मारण्याचा प्रयत्न केला असता फिर्यादी मध्ये पडल्याने आरोपीने फिर्यादीच्या मगटावर ब्लेडने वार करुन जखमी केले आहे, असे फिर्यादीत नमूद आहे.
ही घटना (दि. ११) रोजी १.३० ते ३.०० वा. दरम्यान फिर्यादीच्या राहत्या घरी जे. ए. अगरवाल चाळ, महाविर पार्क, चिंचवड येथे घडला.
फिर्यादी महिलेने आरोपी मुलगा प्रविण शिवराम नवकुडकर वय ४१ वर्षे, रा. चिंचवड) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. पिंपरी पोलिसांनी आरोपीविरोधात (दि. १२) रोजी १८३/२०२३ भा.दं.वि.सं.कलम ३०७, ३२४, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.















