न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ फेब्रुवारी २०२३) :- वाल्हेकरवाडी येथील ओढयामध्ये पाण्याच्या बाजुला स्त्री जातीचे अर्भक आढळले आहे. ही घटना (दि. १२) रोजी ११.४६ वाजेच्या सुमारास उघडकीस आली.
अज्ञात पालकाविरोधात अर्भकाचा परित्याग करुन त्याला उघडयावर टाकुन सोडुन निघुन गेल्याने चिंचवड पोलिसांनी ७५/२०२३ भादवी कलम ३१७,३१८ नुसार गुन्हा दाखल आहे.















