न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ फेब्रुवारी २०२३) :- दापोडी येथील हत्याकांडातील आरोपीने न्यायालयासमोर खुनाची कबुली दिली आहे. त्याने न्यायालयाकडे फाशीची मागणी केली आहे.
प्रमोद त्र्यंबक मंगरुळकर (वय ३२) असे खुनाची कबुली दिलेल्या आरोपीचे नाव आहे. मारुती नारायण काटे (वय ६०), संगीता मारुती काटे (वय ५५) अशी खून झालेल्या पती-पत्नीची नावे आहेत.
दापोडी येथील काटे दाम्पत्याच्या घरात घुसून आरोपीने टिकावाने दाम्पत्यावर घाव घातले होते. यामध्ये गंभीर दुखापत झाल्याने काटे दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच भोसरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मंगरूळकर याला ताब्यात घेतले होते. आपल्या आईवर झालेल्या अत्याचाराचा बदला घेतल्याचे आरोपीने पोलिसांना सांगितले. आता आपल्याला जगण्याची कोणतीही इच्छा नसल्याचेही आरोपीने पोलिसांना सांगितले आहे.