न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ फेब्रुवारी २०२३) :- पिंपरी चिंचवड माथाडी व असंरक्षित कामगार मंडळाच्या नावाचा बनावट लेटरहेड आणि शिक्का तयार केला. त्यावर खोटी सही केली. त्याच्या साह्याने पत्र तयार करून निपॉन एक्सप्रेसई, प्रा. लि. म्हाळुंगे-चाकण औद्योगिक वसाहत, खेड या कंपनीला दिले. आरोपीने माथाडी कामगार मंडळाची फसवणुक केली आहे.
ही घटना (दि.७ /११/२०२२ ते दि. २३/११/२०२२) दरम्यान गुलनुर बिल्डींग, दुसरा मजला, रेल्वे मालधक्का जवळ, चिंचवड येथे घडली.
फिर्यादी बाळु देवराम वाळुज (वय ४३ वर्षे धंदा नोकरी, रा. साई सृष्टी होसिंग सोसायटी, म्हाळसकर कॉलनी, वडगांव मावळ) यांनी आरोपी अज्ञात इसमाविरोधात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी चिंचवड पोलिसांनी ७६/२०२३ भा.दं.वि. कलम ४२०, ४६५,४७१ अंतर्गत अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.