न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ फेब्रुवारी २०२३) :- स्पा सेंटरच्या नावाखाली पिडीत महिलांना पैशांचे अमिष दाखवले. त्यांना वेश्या व्यवसायासाठी प्रवृत्त केले. त्यातून मिळालेल्या रकमेतून आरोपींनी स्वतःची उपजिवीका भागवली. परिसरात साई सिध्दी होमीओपॉथिक क्लिनीक व ओबी लॉजिस्टीक हा संवेदनशील भाग असताना त्यांनी हा व्यवसाय चालविला.
ही घटना (दि. १३) सायंकाळी ७.०५ वाजेच्या सुमारास सिल्वर मॉल, तिसरा मजला, शॉप नं. २०. बीपीएस सेंटर शिवरोड, चिखली येथील बीपीएस स्पा मध्ये घडली. चिखली पोलिसांनी कारवाई करून आरोपींना ताब्यात घेतले.
स्पा मॅनेजर भुषण दत्तात्रय माळी (वय २४ वर्षे, रा. शुभम हाईट्स, चौथा मजला, फ्लॅट नं. ४०२, पिंपळे सौदागर, मुळगाव खलाने ता. सिंदखेडा जिल्हा धुळे), स्पा चालक मालक पाहिजे आरोपी शैलश वाल्हे (पुर्ण नाव पत्ता माहित नाही) या दोघांच्या विरोधात चिखली पोलीस ठाण्यात ९८/२०२३ भा.द.वि. कलम ३७० (३), ३४ सह अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कायदा १९५६ चे कलम ३,४,५,७ अन्वये गुन्हा दाखल करीत एकाला अटक केली आहे.