न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ फेब्रुवारी २०२३) :- दारु किंवा त्यासारखे मादक पदार्थाचे सेवन करून आरोपीने हॉटेलच्या वेटरला सिगरेट घेण्याच्या कारणावरून हाताने मारहाण केली. त्यानंतर आरोपी बजाज अँव्हेन्जरवरुन पळुन जात असताना सह आरोपी २ याने निष्काळजीपने गाडी चालवली. त्यामुळे गाडी स्लिप होऊन त्यामागे बसलेला आरोपी याच्या दोन्ही गुडघ्याला व दोन्ही हाताच्या कोपराला किरकोळ मार लागला. त्यानंतर दोघे आरोपी दुचाकीवरून पळून जात असताना फिर्यादी पोलिसाने थांबवले. मात्र, त्यांनी फिर्यादी व साक्षीदार यांच्याशी उध्दटपणाचे वर्तन केले. सार्वजनिक ठिकाणी मोठमोठ्याने आरडाओरडा करुन सार्वजनिक शांततेचा भंग केला आहे, असे फिर्यादी म्हटले आहे.
हा प्रकार (दि. १४) रोजी पहाटे ३.०० वा. रॉयल कासा ते वाल्हेकरवाडी रोडवर असलेल्या हॉटेल टॉप ८७ जवळ रावेत येथ घडला. रावेत पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी यांनी आकाश करम गंगावणे (वय २८ वर्षे धंदा खाजगी नोकरी रा. ज्ञानदीप शाळेजवळ, रूपीनगर, तळवडे), भुषण राजेंद्र राक्षे (वय २६ वर्षे धंदा खाजगी नोकरी रा. ज्ञानदीप शाळेजवळ, रूपीनगर, तळवडे) या दोघांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
रावेत ९४/२०२३ भादवि कलम २७९, ३३७,३४ मो. व्हि अॅक्ट कलम १८५ (१), महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम कलम ८५ (१) सह कलम महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ११०,११२/११७ अन्वये गुन्हा दाखल केला असून दोघांना सी.आर.पी.सी. ४१ (अ) प्रमाणे नोटीस देण्यात आली आहे.