न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ फेब्रुवारी २०२३) :- बीआरटीमधून जाणाऱ्या खाजगी वाहनांवर मोटार वाहन कायद्यान्वये रक्षक चौक व पिंपळे सौदागर बीआरटी लेन येथे कारवाई करण्यात आली आहे. बीआरटी मधून येणा-या एकूण २०० खाजगी वाहनांवर केसेस व दंड रुपये रक्कम १,३९,००० आकारण्यात आला आहे.
पीटीपी नाकाबंदी दरम्यान एकूण ६४ वाहनांवर अनपेड दंड असलेल्या वाहनचालकांकडून दंड रक्कम रुपये ४०,१०० दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच दि. ०१/०२/२३ ते १४/०२/२०२३ रोजी पर्यंत विशेष मोहिम अंतर्गत बीआरटीमधून येणा-या एकूण ९५० खाजगी वाहनांवर केसेस व दंड रुपये रक्कम ६,३६,००० आकारण्यात आला आहे. नो एंट्री मधून येणा-या वाहनावर एकूण ७७ केसेस व दंड रुपये रक्कम ६,८,६०० आकारण्यात आला आहे. काळी काच ब्लॅक फिल्म लावण्यात आलेल्या एकूण १४० वाहनांवर केसेस दंड रक्कम रुपये १४९००० आकारण्यात आला आहे. पीटीपी नाकाबंदी दरम्यान एकूण १९३१ वाहनांवर अनपेड़ दंड असलेल्या वाहन चालकाकडून दंड रक्कम रुपये १३,८७,७५० दंड वसूल करण्यात आला आहे.
सांगवी वाहतूक विभागातील अधिकारी व अमलदार यांनी कारवाई केली. यापुढेही वाहतूक नियमांचे उल्लंघन करणा-या वाहनचालकांवर मोटार वाहन कायद्यान्वये जास्तीत जास्त कारवाई सुरु राहणार असून नागरिकांना वाहतूक नियमांचे पालन करावे, असे आवाहन सांगवी वाहतूक विभागाने केले आहे.