न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ फेब्रुवारी २०२३) :- कंपनीतून घरी पायी जात असताना काळया रंगाची फोर व्हिलर गाडी (एमएच०५एजे७४१७) मधील आरोपींनी फिर्यादीचा पाठलाग केला. फिर्यादी या घाबरुन रुमवर चालत गेल्या. त्यांनी रुमचा आतमधुन दरवाजा बंद केला. दरम्यान फिर्यादीला रुमचा दरवाजा जोरजोरात वाजविण्याचा आवाज येवु लागला. तेव्हा फिर्यादी यांनी आवाज देवुन विचारले कोण आहे. तेव्हा बाहेरुन आरोपीने ‘मला तुझ्याशी बोलायचे आहे. तु दरवाजा उघड’ असा आवाज दिला. फिर्यादी घाबरुन त्याला ‘मला तुझ्याशी बोलायचे नाही. तु निघुन जा’, असे म्हणाल्या. आरोपीने जोरजोरात दरवाजावर हाताने मारुन अर्वाच्य व अश्लिल भाषेत फिर्यादीला शिवीगाळी केली. घरात घुसण्याचा प्रयत्न केला. तेव्हा फिर्यादीने पोलीस कॉस्टेबलला फोन करून घटनाक्रम सांगितला. पोलिसाने आरोपीला ताब्यात घेतले, असे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना (दि. १५) रात्री १०.०० वाजेच्या सुमारास भैरवनाथनगर, म्हाळुंगे येथे घडली.
२० वर्षीय महिला फिर्यादीने आरोपी विकास राकेश सरवदे (वय २५ वर्षे रा. चिखली), राजेश रामदास पाटोळे (वय २८ वर्षे रा. निगडी), ज्ञानेश्वर बाबुराव वैरागे (वय ३६ वर्षे कृष्णानगर), आकाश मोकींद कांबळे (वय २३ वर्षे, रुपीनगर) या चौघांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी २५/२०२३ भादवी कलम ३५४ (४), ५०४, ३४ नुसार गुन्हा दाखल करीत चौघांना अटक केली आहे.
















