न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ फेब्रुवारी २०२३) :- जेवण्यापुर्वी फिर्यादी व त्यांचा मित्र गणेश भुंडे हे सिगारेट ओढण्यासाठी टपरी बाहेर थांबले. तेथे फिर्यादीचा दुसरा मित्र शुभम सुतार याने हॉटेलच्या दिशेने दगड मारल्याच्या कारणावरुन हॉटेलमधील दोन कामगार आणि एकाने फिर्यादीला हॉटेलमध्ये तसेच हॉटेलच्या बाहेर हाताने व लाथाबुक्यांनी मारहाण केली. त्यांना जखमी करुन शिवीगाळ केली. भांडणात फिर्यादीच्या गळयातील सोन्याच्या चैनमधील काही भाग पडुन फिर्यादीचे नुकसान झाले आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.
फिर्यादी प्रथमेश विलास इंगवले (वय २६ वर्षे, धंदा नोकरी, रा. पेबल्स अरबर्निया, सी विंग, आठवा मजला, फलॅट नं ११, बापुजीबुवा मंदीराजवळ, बावधन) यांनी आरोपी गरुड (पुर्ण नाव पत्ता माहीत नाही), सोबत दोन अनोळखी इसम यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
हा प्रकार (दि १५) रोजी रात्री ७.३० वाजेच्या सुमारास मिरा हॉटेल, खंडोबा मंदीर, बावधन येथे घडला. हिंजवडी पोलिसांनी १३०/२०२३ भा.दं.वि. कलम ३२५,१७०,३४ प्रमाणे तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
















