न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ फेब्रुवारी २०२३) :- व्हॉटसअपवर मॅसेज करून फिर्यादीला आरोपींनी टेलीग्रॅम ग्रुपमध्ये अॅड केले. फिर्यादी यांना http://cry ptoo.com या वेबसाईटवर क्रिप्टो अकाउंट ओपन करण्यास सांगितले. फिर्यादीने त्यांचे ई-मेल आयडी abhishek. mathur 05@ gmail .com वरुन क्रिप्टो अकाउंट उघडले. त्यामध्ये त्यांना अकाउंट आयडी १०००१०७१ हा मिळाला. आरोपींनी टेलिग्राम आय.डी. नंबर @RSHIV ANI123 वरुन फिर्यादी यांना मॅसेज केला. फिर्यादी यांना अकाउंट नंबर दिले. तसेच त्यांनी त्यानंतर @KAVIN198601 टेलिग्राम आय.डी. नंबर दिला. त्या आयडीवरुन किती पैसे भरवयाचे आहेत हे त्यांना सांगितले. त्यानंतर आरोपींनी फिर्यादीला अकाउंटवर वेळोवेळी १४,४८,९०० रक्कम भरण्यास सांगितली. फिर्यादीने त्यांच्या क्रिप्टो अकाउंटला दिसणारी २८,८०,००० रक्कमेपैकी काही रक्कम काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या अकाउंटमधून फिर्यादी यांना पैसे काढता आले नाहीत. आरोपींनी फिर्यादीच्या रकमेचा अपहर करीत त्यांची आर्थिक फसवणुक केली.
फिर्यादी अभिषेक कमलकुमार माथुर (वय ४३ वर्षे धंदा नोकरी, रा. मारुंजी) यांनी आरोपी मोबाईल क्रमांक ९९६२२८७८९१२३ धारक, http://cryptoo 00.com या वेबसाईट धारक, आय. डी. नंबर @ RSH IVANI123 धारक, आय. डी. नंबर @KAVIN198601 धारक, युपीआय आयडी thakursing4 80-1@okaxis Shivam Singh व d d 2417 @ freechar ge धारक, अॅक्सीस बँक अकाउंट धारक मनिष कोंडाल Account : 92202000 85605 534, आयसीआयसी बैंक अकाउंट धारक युनिक A/C No: 41040 5500201, एस बैंक Account No: 046463300003354 धारक (आरोपी पुर्ण नाव व पत्ता माहीत नाही) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
ही घटना (दि. १५) सायंकाळी ४.१५ वाजता ते रात्री ९.३० वाजता वर्ल्ड लाईन ग्लोबल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमीटेड, मिडास टॉवर, फेज-१, हिंजवडी व रा. फलॅट नंबर २१०५, बी बिल्डींग, आर ४ सेक्टर, लाईफ रिपब्लीक सोसायटी, मारुंजी येथे घडली. हिंजवडी पोलिसांनी आरोपी विरोधात १३१/२०२३ भा.दं.वि.क ४२०, ४०६ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
















