- पाच महिलांची सुटका; एकजण अटकेत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ फेब्रुवारी २०२३) :- स्पा सेंटरच्या नावाखाली आरोपी यांनी संगणमत करून ५ पिडीत महिलांना पैशांचे अमिष दाखवले. त्यांना स्पा मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसायासाठी प्रवृत्त केले. त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करवून घेऊन त्यातून मिळालेल्या रकमेतून स्वतःची उपजिवीका भागविली.
जवळच वेद क्लिनिक व दाताचा दवाखाना, विबग्योर राईज नावाची शाळा असताना स्पामध्ये वेश्याव्यवसाय चालवला. सांगवी पोलिसांच्या अनैतिक मानवी प्रतिबंधक कक्षाने (दि. १५) सायंकाळी ५.०५ वाजेच्या सुमारास एच-३०१, ला विदा लोका काटे वस्ती, पिंपळे सौदागर, सांगवी येथील age line touch the beauty नावाच्या स्पा वर कारवाई केली. एकाला ताब्यात घेतले. आरोपींवर सांगवी पोलीस ठाण्यात ६३/२०२३ भा.द.वि. कलम ३७० (२), ३४ अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६ चे कलम ३,४,५,७ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
स्पा मॅनेजर शाकीर समीरउद्दीन अहमद (वय २६ वर्षे रा. सध्या स्पामध्ये; मुळ पत्ता- घनीयरपार होजाई राज्य-आसाम) याला अटक करण्यात आली असून पांडे चंकी धर्मेंद्र (वय २२ वर्षे रा. पाचपीर चौक, आदर्शनगर, काळेवाडी), मंगेश भगवान जाधव (वय ३५ वर्षे रा. हिंजवडी) यांचा पोलीस शोध घेत आहेत.
















