- प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून स्वागत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ फेब्रुवारी २०२३) :- चिंचवडच्या पोटनिवडणुकीने शहराचे राजकारण अक्षरषः ढवळून निघाले आहे. भाजपाच्या प्रचाराचा झंजावात सरु असतानाच आणखी एक राष्ट्रवादीचा प्रदेश पातळीवरील पदाधिकारी भाजपाच्या गळाला लागला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस कामगार सेलचे प्रदेश उपाध्यक्ष जमील हिदायत अवटी व त्यांचे ४० सहकारी यांनी आज प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला.
दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर चिंचवड विधानसभेची पोटनिवडणूक होत आहे. सध्या प्रचाराची रणधुमाळी सुरू असल्याने शहराचे वातावरण भाजपमय झाले आहे. सर्वत्र पक्षाचा झंजावात असताना राष्ट्रवादी कॉंग्रेस कामगार सेलचे प्रदेश उपाध्यक्ष जमील हिदायत अवटी व त्यांचे ४० सहकारी यांनी भाजपात प्रवेश केला आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत युवा मोर्चाच्या शहर सरचिटणीस तेजस्विनी कदम यांच्या नेतृत्वात अवटी यांचा भाजपात प्रवेश करुन घेण्यात आला. यावेळी भाजपाचे प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे, माजी नगरसेवक शुत्रुघ्न काटे, युवा मोर्चाचे शहराध्यक्ष संकेत चोंधे आदी यावेळी उपस्थित होते.
जमील हिदायत अवटी हे रक्षक संभाजी संघाचे संस्थापक अध्यक्ष आहेत. राजकारणाच्या पलीकडे जाऊन संस्थेच्या माध्यमातून त्यांनी समाजात मोठे योगदान दिले आहे. समाजातील दिनदुबळ्या, वंचित, निराधार व्यक्तींची मदत केली आहे. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन आज पक्षात प्रवेश करवून घेण्यात आला आहे.


















