न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ फेब्रुवारी २०२३) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज विचार प्रबोधन पर्व २०२३ चे आयोजन भक्ती-शक्ती चौक निगडी, संभाजीनगर चिंचवड, डांगे चौक थेरगाव आणि एच.ए. कॉलनी, पिंपरी या चार ठिकाणी करण्यात आले आहे. या पर्वात भक्ती-शक्ती चौक आणि संभाजीनगर चिंचवड येथे काल झालेल्या कार्यक्रमास नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.
आजच्या निगडी येथील कार्यक्रमात उप आयुक्त रविकिरण घोडके, कार्यकारी अभियंता संजय खरात, नितीन देशमुख, माजी नगरसदस्य मारुती भापकर,सचिन चिखले, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे,जनसंपर्क विभागाचे प्रमुख प्रफुल्ल पुराणिक,प्रकाश जाधव,सतीश काळे, धनाजी येळकर पाटील,जीवन बोराडे,सागर तापकीर, नकुल भोईर,राणेश दाहिभाते, ज्ञानदेव लोभे,राजेंद्र देवकर,गणेश सरकटे,गणेश भांडवलकर,सचिन आल्हाट,राजू पवार,सुरज ठाकर, संतोष वाघ,अभिषेक म्हसे,निलेश शिंदे, जालींदर खतकर,कल्पना गिड्डे,दादासाहेब पाटील,कुणाल कांबळे,स्वप्नील शिंदे,दत्तात्रय शिंदे,विनायक जगताप,वैभव फाळके,शहश कानेकर,श्रेयश कानेकर,अनिकेत रसाळ, भावेश काचा, नकूल भोईर, शिवजयंती भक्ती-शक्ती समितीचे सदस्य तसेच विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
निगडी येथील भक्ती-शक्ती चौक येथे महाराष्ट्रातील ख्यातनाम शाहीर सम्राट अवधूत विभूते, शुभम विभूते यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर पोवाडे सादर केले. त्यामध्ये शिवाजी महाराजांचे बालपण,जिजाऊंनी दिलेले संस्कार,शहाजी राजांची शिकवण, महाराजांच्या मावळ्यांचे शौर्य यांचे वर्णन होते. अंगात शिवरक्त संचारलेला,साठी पार केलेल्या या शाहिराने संगीत आणि शाहिरी क्षेत्रात आजपर्यंत ४७३ विद्यार्थ्यांना तयार केले आहे असल्याचे सांगितले. त्यानंतर ख्यातनाम शिवव्याख्याते प्रशांत देशमुख यांचे “छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यवस्थापन” या विषयावर व्याख्यान होते. देशमुख यांनी त्यांच्या व्याख्यानात छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा सतत प्रेरणादायी असून तो सर्वांना कोणत्याही संकटावर मात करण्याचे मनोबल आणि सामर्थ्य देतो असे सांगितले. शिवचरित्र वाचले तर आपोआपच लढण्याचे बळ मिळेल, देशविदेशातील इतिहासकार, संशोधक मंडळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजनीती, युद्ध कौशल्य, संघटन कौशल्याचा अभ्यास करतात, त्यांच्या पराक्रमांचा आदर्श घेतात असे सांगितले.
उप आयुक्त रविकिरण घोडके आणि शिवजयंती भक्ती-शक्ती समितीच्या सदस्यांनी शाहीर अवधूत विभूते, त्यांचे चिरंजीव शुभम विभूते आणि शिवव्याख्याते प्रशांत देशमुख यांचा सत्कार केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उप आयुक्त रविकिरण घोडके यांनी आणि शाहिरांचा परिचय व सूत्रसंचालन प्रफुल्ल पुराणिक यांनी केले तर आभार शिवजयंती भक्ती-शक्ती समितीचे जीवन बोराडे यांनी मानले.


















