न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ फेब्रुवारी २०२३) :- चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या प्रचारार्थ राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांची उद्या (दि. १८) पिंपळे निलख येथे जाहीर सभा होणार आहे.
पिंपळे निलख येथे शनिवारी (दि. १८) सायंकाळी ही सभा होणार असून या सभेकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. या सभेत भाजपचे काही पदाधिकारी, माजी नगरसेवक आपल्या समर्थकांसह राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत, असे कळते.
चिंचवड विधानसभेची सध्या पोटनिवडणूक सुरू आहे. महाविकास आघाडीने भाजपासमोर मोठे आव्हान उभे केले आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे यांचा विजय अधिक दमदार करण्यासाठी राष्ट्रवादीने भाजपला खिंडार पाडण्याची योजना आखली आहे. त्याचाच प्रत्यय उद्याच्या अजितदादा पवार यांच्या सभेत येणार?.


















