न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ फेब्रुवारी २०२३) :- पवना धरणातील hydro system नादुरुस्त झाली आहे. त्यामुळे जलसंपदा विभागाकडुन धरणातून सोडण्यात येणारे पाण्याचे प्रमाण कमी झाले आहे.
आज शनिवारी (दि. १८) रोजी दिवसभर संपुर्ण पिंपरी चिंचवड शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा वापर योग्य व जपुन करावा. विस्कळीत पाणी पुरवठा लवकरच सुरळीत होईल, असे आवाहन पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने केले आहे.


















