न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ फेब्रुवारी २०२३) :- दही-दूध, बेल-फूल पूजेचे ताट घेऊन दर्शनासाठी येणारे भाविक, कानी पडणारी महादेवाची गाणी व हर हर महादेवचा गजर अशा प्रसन्न वातावरणात शनिवारी (दि. १८) रोजी महाशिवरात्री शहरात उत्साहात साजरी होत आहे. पहाटेपासूनच शहरातील महादेव मंदिरात दर्शनासाठी रांगा लागल्या आहेत.
महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाची आराधना, व्रत करून मनोभावे दर्शन घेतले जाते. जवळच्या शिवमंदिरात जाऊन अभिषेक, पूजा करतात. पिंपरी-चिंचवड शहरातही अनेक ठिकाणी शिवमंदिरे आहेत. यामध्ये काही प्राचीन शिवालयाचाही समावेश आहे. या मंदिरातही शनिवारी महापूजा, अभिषेक, भजन, कीर्तन, महाप्रसाद यासह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
दर्शनासाठी रांगा लागल्या आहेत. अनेकजण सहकुटुंब दर्शनाला येताना दिसतेय. दुपारी बारापर्यंत गर्दी होती. शहरातील मंदिरांना फुलांची सजावट करण्यासह रोषणाई केली आहे.
















