न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ फेब्रुवारी २०२३) :- मित्राच्या बजाज पल्सरवरून (एमएच१९बीएल५७७७) फिर्यादी व त्यांचे मित्र डबल सिट जात होते. समोरुन शिक्रापुर चाकण रोडने येणारी गाडी (एमएच१२एलजे६८९५) वरील चालकाने गाडी जोरात चालवुन फिर्यादीच्या पल्सरला जोराची धडक दिली. अपघातात फिर्यादीच्या उजव्या पायास मार लागून फॅक्चर झाले. फिर्यादीचा मित्र विशाल मंगेश सावके (वय २२ वर्ष) याच्या डोक्यास आणि हातापायास मार लागुन ते गंभीर जखमी झाले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. शिवाय दुचाकीचे नुकसान केले. आरोपी त्याची गाडी तेथेच सोडुन पळुन गेला, असे फिर्यादीत नमूद आहे.
फिर्यादी गौरव हेमंत सारसकर (वय २५ वर्ष, धंदा नोकरी, रा. पी. जे. हॉस्टेल, अपोलो फार्मसी, शॉ. नं २, बाणेर यांनी आरोपी टाटा कंपनीची गाडी (एमएच१२एलजे६८९५) वरील चालक (नाव पत्ता महित नाही) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
हा अपघात (दि. १७) पहाटे १.०० वाजेच्या सुमारास शेलपिंपळगाव, चाकण-शिक्रापुर रोड, रसिका हॉटेलसमोर घडला. चाकण पोलिसांनी २२१/२०२३ भादवी कलम २७९, ३३७, ३३८, ४२७, ३०४ (अ) मोवा कायदा कलम १८४,१३४/१७७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
















