न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ फेब्रुवारी २०२३) :- महाराष्ट्रमध्ये अनेक किल्ले आहेत. त्यातील काही किल्ले सतत प्रचलित असतात. महाराष्ट्र मधील अनेक शिवभक्त याच किल्ले ची पाहणी किंवा मोहिमा करत असतात आणि महाराष्ट्र ची खरी संपत्ती पाहत असतात. असाच आगळा वेगळा रेकॉर्ड राज दादा तपसे यांनी शिवजयंतीच्या वेळी किल्ले शिवनेरीवर केला. राज दादा तपसे यांची शंभरावी मोहीम पूर्ण झाली. शिवनेरी, रायगड, राजगड, पन्हाळा स्वराज्याच्या तीन राजधानी एक शिवजन्मभुमीच्या प्रत्येकी शंभरी पूर्ण करणारे राज दादा महाराष्ट्रमधील पहिले युवक ठरले आहेत.
गेली १० वर्षाच्या काळात राजदादा यांच्या ८७७ गडकोट मोहिमा झाल्या असून गड संवर्धन, स्वछता मोहीम, अभ्यास मोहीम महाराष्ट्र मधील गडकोटांवर झाल्या आहेत. शिवजयंतीच्या निम्मित राजदादा यांचा शिवनेरी गड शंभर वेळा व राजगड, रायगड, पन्हाळा याधी शंभर वेळा चढून झाला आहे. शतक पूर्ण करणारे राजदादा तपसे महाराष्ट्रमधील पहिले युवक ठरले आहेत.
अनेक गडदुर्ग प्रेमीकडून कौतुक आणि त्यांच्या कार्याची प्रशंसा होत आहे. ते समस्त हिंदू बांधव संस्थाचे महाराष्ट्र सचिव आहेत. आजवर ८७७ गडदुर्गच्या मोहिमा केल्या आहेत. महाराष्ट्रमधील अपरिचित किल्ले पाहणी, गडदुर्गचा अभ्यास करून त्यावर लिखाण करणे हा आवडता विषय आणि छंद आहे. पुणे येथे व्यवसायासाठी आलेल्या या युवकाचे गडकिल्लेबद्दलचे आपले प्रेम या कामगिरीमधून दिसून येते. त्यांना महाराष्ट्रभरात ”सह्याद्रीचे भुते” म्हणून ओळख प्राप्त आहे. महाराष्ट्रभर त्यांचे समर्थक वर्ग आज गडकिल्लेच काम करतात. स्वराज्यातील तीन राजधानी एक शिवजन्मभुमीच ”दुर्गशतकवीर” म्हणून राजदादा यांना मोहिमेमध्ये उपाधी देण्यात आली. या मोहिमेमध्ये समस्त हिंदू बांधवचे सदस्य आणि राज दादा यांचा मित्रपरिवार सामील होता.


















