न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० फेब्रुवारी २०२३) :- बी ए स्पोटर्स क्रिकेट अॅकॅडमी पुणे यांनी आयोजित केलेल्या अंडर-१२ चॅम्पियनशिप लीग स्पर्धेत फ्रेंडस क्रिकेट अॅकॅडमीने बी ए स्पोटर्स क्रिकेट अॅकॅडमीचा १११ धावांनी पराभव करून विजेतेपद पटकावले.
व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अॅकॅडमीच्या मैदानावरती फ्रेंडस क्रिकेट अॅकॅडमीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली आणि १७३ धावा केल्या. फ्रेंड्स क्रिकेट अॅकॅडमीच्या रुद्राक्ष जाधव याने ३९ धावा केल्या. अर्क सोनवणे याने २६ धावा केल्या. शौर्य जाधव याने २७ धावा केल्या शार्दुल मुरकुटे याने १५ धावा केल्या. पृथ्वी पालनेने १३ धावा केल्या. अर्जुन शिंदेने ८ तर कृष्णाने ६ धावा केल्या.
फ्रेंड्स क्रिकेट अॅकॅडमीच्या उत्कृष्ट गोलंदाजीपुढे बी ए स्पोर्ट्स क्रिकेट अॅकॅडमीचा डाव अवघ्या ६२ धावांमध्ये संपुष्टात आला. फ्रेंड्स क्रिकेट अॅकॅडमीच्या आर्यन खडकेने हॅट्रिक घेऊन सामनावीर म्हणून पुरस्कार पटकावला. मॅन ऑफ द सिरीज चा बहुमान शौर्य जाधव याने मिळवला. या स्पर्धेमध्ये सहा संघांनी भाग घेतला होता.