- बांधकाम विश्वातील अग्रणी मोरया असोसिएट्सचा वर्धापनदिन उत्साहात साजरा..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० फेब्रुवारी २०२३) :- बांधकाम विश्वातील अग्रणी मोरया असोसिएट्सने नुकतेच पाचव्या वर्षात यशस्वीपणे पदार्पण केले. त्यानिमित्त पिंपरीतील मोरवाडी येथील कार्यालयात संस्थेचा पाचवा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ग्राहकांसह अनेक हितचिंतकांनी शुभेच्छांचा वर्षाव मोरया असोसिएट्सवर केला.
यावेळी असोसिएट्सचे अध्यक्ष तथा उद्योजक ज्ञानेश्वर कडू, नॉव्हेल इंटरनॅशनल स्कूलचे कार्यकारी संचालक विलास जेऊरकर, सीए एन. सी. लाहोटी, उद्योजक सुनील शितोळे, उद्योजक विशाल बालघरे, पोलीस सहायक निरीक्षक सचिन देशमुख, कर सल्लागार सी.एम. फुगे, समीर जेऊरकर, कपिल चोपडा, निरव शहा, सत्यवान मते, रणजित सोनवणे, वाढवणे साहेब, सर्व मित्र मंडळी व मोरया असोसिएट्सचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.
उद्योजक ज्ञानेश्वर कडू म्हणाले, गेल्या काही वर्षांपासून शहरातील विविध ठिकाणी आम्ही गृहप्रकल्प उभारले आहेत. विश्वासाहर्ततेच्या बळावर नवनवीन ग्राहक आमच्याशी जोडले गेले. भविष्यात ग्राहकांच्या बजेटमध्ये आणखी मोठे गृहप्रकल्प उभारण्याचा मानस आहे, असा मनोदय त्यांनी न्यूज पीसीएमसी शी बोलताना व्यक्त केला.












