न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० फेब्रुवारी २०२३) :- विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेवुन, तसेच माहेरहून सोन्याचे दागीने व फॉरच्युनर गाडी घेण्यासाठी व किराणा दुकानासाठी पैसे घेवुन ये, असे म्हणुन मानसिक त्रास दिला. “तुला स्वयंपाक येत नाही, तु माझ्या मुलाची बरोबरी करू शकत नाही” असे वेळोवेळी म्हणुन शिवीगाळ करुन आरोपींनी फिर्यादीच्या मुलीस वेळोवेळी शारीरीक व मानसिक त्रास देवुन कट रचुन तिला मारहाण केली. तिचा कशाच्यातरी सहाय्याने गळा दाबुन तिला जिवे ठार मारले आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना सन २०१७ ऑगस्ट महिन्यापासून ते दि. १८/०२/२०२३ रोजी सकाळी ७.४५ वाजता ग.नं ५९६, शुभारंभ सोसायटी जवळ, जाधववाडी चिखली येथे पिडीतेच्या राहत्या घरी घडली.
फिर्यादी सोमनाथ हरीभाऊ होले (वय ५६ वर्षे, धंदा नोकरी, रा. वानवडी, सर्वे नं.११. हा गणेश मंदीराजवळ) यांनी आरोपी पती प्रविण काळुराम जाधव (वय ३३ वर्षे, धंदा व्यवसाय), सासरे काळुराम विठ्ठल जाधव (वय ५२ वर्षे धंदा व्यवसाय), महिला आरोपी (सर्व रा. गट नं. ५९६, शुभारंभ सोसायटी जवळ, जाधववाडी चिखली) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
चिखली पोलिसांनी १०७/२०२३ भादवी कलम ३०२, ३०४(४), ४९८ (अ). १२०(ब), ३२३, ५०४, ३४ हुंडा प्रतिबंधक अधिनियम कलम ३ व ४ प्रमाणे गुन्हा दाखल करीत तिघांना अटक केली आहे. श्वेता प्रविण जाधव (वय २७ वर्ष) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे.