न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० फेब्रुवारी २०२३) :- भोसरी एमआयडीसी ते पिंपरीतील शनि मंदिर दरम्यान (दि. १८) रोजी ८.३० वाजेच्या सुमारास फिर्यादी ही त्यांच्या पती आणि मुलीसह रस्ता ओलांडत असताना किरन मेडिकल समोर एका काळ्या रंगाच्या दुचाकीवरील अज्ञात चालकाने भरधाव दुचाकी चालविली.
त्यावेळी फिर्यादीची मुलगी आरुषीला त्याने धडक दिली. त्यात ती गंभीर जखमी झाली. आरोपी दुचाकी चालक न थांबता वल्लभनगरच्या बाजुला निघुन गेला, असे फिर्यादीत नमूद आहे.
फिर्यादी रेणुका अजित कांबळे (वय ३२, धंदा गृहिणी, रा संत तुकारानगर, शनि मंदिराजवळ, पिंपरी यांनी आरोपी अज्ञात इसमाच्या विरोधात फिर्याद दिली आहे. पिंपरी पोलिसांनी २०५/२०२३ भादवि कलम २७९, ३३७,३३६, मोटार वाहन कायदा कलम १३४/१७७ अन्वये आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
















