न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० फेब्रुवारी २०२३) :- भोसरी एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत गायकवाड वस्ती, मोशी टोलनाका, घाटाजवळ, इंद्रायणी नदीच्या कडेला गार्डनमध्ये (दि. १९) रोजी दुपारी २.५० वाजेच्या सुमारास आरोपीने आपल्या कब्जात १०० रुपये किंमतीचा ३ ग्रॅम गांजा व गांजा ओढण्याचे साहित्य एकुण १०० रु. किं.चा माल अनाधिकाराने, बेकायदेशिररित्या जवळ बाळगला.
तपकिरी रंगाच्या मातीच्या चिलीममध्ये गांजा भरुन त्यातुन येणारा धुर ओढत असताना व सेवन करताना अंमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखेने आरोपीला ताब्यात घेतले.
भोसरी एमआयडीसी पोलिसांनी ५८/२०२३ एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क). २७ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. शोयब शालेशा मकानदार (वय २४ वर्षे रा. आदर्शनगर, कळसकर याचे रुममध्ये, मोशी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.












