न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० फेब्रुवारी २०२३) :- पिंपरी चिंचवड शहरात पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत शस्र बाळगण्यास मनाई आहे. या आदेशाचा आरोपींनी भंग केला. त्याने बारा लाखांच्या हुंदाई कंपनीच्या क्रेटा गाडीत ३५,००० रूपये किंमतीची एक लोखंडी पिस्टल व ५०० रूपये किंमतीचे एक जिवंत काडतुस (राऊंड) असे एकुण १२,३५,५०० रूपये किंमतीचा माल कोणताही कायदेशीर परवाना नसताना जवळ अवैधरित्या बाळगला.
दरोडाविरोधी पथक, गुन्हे शाखा यांनी (दि. १९) रोजी पहाटे ३:०० वा चे सुमारास कुणाल बेलेझा बिल्डींग समोर, बावधन येथे कारवाई करीत आरोपीला ताब्यात घेतले. हिंजवडी पोलिसांनी आरोपींविरोधात १३६/ २०२३, भारतीय हत्यार कायदा कलम ३ (२५) महाराष्ट्र पोलीसकायदा कलम ३७ (१) (३) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
संदिप ऊर्फ भैय्या दशरथ तुपे (वय-२७ वर्षे, कांदलगाव, इंदापुर), किरण नवनाथ गोरे (वय-२६ वर्षे, रा. लेन नंबर ०१, श्री कृष्ण कॉलनी, थेरगाव फाटा, डांगेचौक, वाकड), महेश शिवाजी कुंभारकर (वय २६ वर्षे, रा. सदर), रोहन लक्ष्मण लोंढे (वय-२२ वर्षे, रा-लेन नंबर ०३, श्री कृष्ण कॉलनी, थेरगाव फाटा, डांगेचौक, वाकड) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.












