न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० फेब्रुवारी २०२३) :- शासनामार्फत दरवर्षी १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची सर्व शासकीय कार्यालयात जयंती साजरी करण्यात येते. या दिनाचे औचित्य साधून या थोरपुरुषाचे ज्या ज्या ठिकाणी पुतळे अथवा स्मारके आहेत, तेथे देखील छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात येते.
सामान्य प्रशासन विभागाच्या १ फेब्रुवारी, २०२३ शासन निर्णयान्वये महाराष्ट्राच्या राज्यगीताची घोषणा करण्यात आली आहे. यानुसार छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंतीचे औचित्य साधून सदर गीत १९ फेब्रुवारी, २०२३ पासून महाराष्ट्राचे राज्य गीत म्हणून अंगीकारण्याचा निर्णय शासनामार्फत घेण्यात आला आहे. त्यानुसार महाराष्ट्र शासनाने छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचीत्य साधून दि. १९ फेब्रुवारी रोजी “ जय जय महाराष्ट्र माझा ” या राज्यगीताचा वापर करावा असे निर्देश सर्व शासकीय कार्यालयांना दिले होते.
या अनुषंगाने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने १९ फेब्रूवारी रोजी पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये त्याचप्रमाणे भक्ती-शक्ती, निगडी या ठिकाणी आयोजित केलेल्या “छत्रपती शिवाजी महाराज विचार पर्वाच्या” दिनी हजारो नागरिकांच्या उपस्थितीमध्ये “जय जय महाराष्ट्र माझा” या गीताचे सादरीकरण महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांचे प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, उल्हास जगताप, उप आयुक्त रविकिरण घोडके, जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक, शिवजयंती उत्सव समितीचे माजी नगरसेवक मारुती भापकर, सचिन चिखले, जीवन बोराडे, सागर तापकीर, नकुल भोईर, राणेश दाहिभाते, ज्ञानदेव लोभे, राजेंद्र देवकर, गणेश सरकटे, गणेश भांडवलकर, सचिन आल्हाट, राजू पवार, सुरज ठाकर, संतोष वाघ, अभिषेक म्हसे, निलेश शिंदे, जालींदर खतकर, कल्पना गिड्डे, दादासाहेब
पाटील, कुणाल कांबळे, स्वप्नील शिंदे, दत्तात्रय शिंदे, विनायक जगताप, वैभव फाळके, शहश कानेकर, श्रेयश कानेकर, अनिकेत रसाळ, भावेश काचा, नकूल भोईर, सुरेंद्र पासलकर, सर्जेराव जुनवणे, तात्याबा माने, संजय रवेंगरे, संतोष ढोरे, सुनीत थोरात आदी उपस्थित होते.












