- वीस लाखांचा धनादेश बॅडमिंटन असोसिएशनकडे सुपूर्द…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ फेब्रुवारी २०२३) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशन, बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या मान्यतेने आणि पुणे जिल्हा मेट्रोपॉलिटन बॅडमिंटन असोसिएशन (पीडीएमबीए) वतीने राष्ट्रीय वरिष्ठ गट बॅडमिंटन स्पर्धा २०२३ या स्पर्धेसाठी सह आयोजकत्व स्विकारले आहे.
त्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे वतीने अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांनी २० लाख रकमेचा धनादेश पुणे जिल्हा मेट्रोपॉलिटन बॅडमिंटन असोसिएशन यांचे नावे या संस्थेचे सह कार्यवाह राजीव बाग यांचेकडे सुपूर्द केला.
यावेळी सहशहर अभियंता संजय कुलकर्णी, प्रभारी क्रीडा अधिकारी अनिता केदारी, जनसंपर्कचे प्रफुल्ल पुराणिक, राजेंद्र नागपुरे आदी उपस्थित होते.
सदर स्पर्धेत अनेक आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू सहभागी होणार आहेत त्यातील महाराष्ट्राच्या संघातून मालविका बनसोड, चिराग शेट्टी हे दोघे सहभागी होणार आहेत त्याचबरोबर एच एस प्रनोय, लक्ष्य सेन, कीदांबी श्रीकांत, अश्रीत कश्यप, गायत्री गोपीचंद, त्रेसा जॉली, ध्रुव कपीला इ. खेळाडू सहभागी होणार आहेत अशी माहीती पुणे जिल्हा मेट्रोपॉलिटन बॅडमिंटन असोसिएशनचे सहकार्यवाह राजीव बाग यांनी दिली.












