न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ फेब्रुवारी २०२३) :- महापालिका पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता देवन्ना गवार यांच्याकडे भामा आसखेड प्रकल्पाची सोपवण्यात आलेली जबाबदारी काढून घेण्यात आली आहे. त्याऐवजी फ क्षेत्रीय पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता दीपक पाटील यांच्याकडे अतिरिक्त पदभाराद्वारे जबाबदारी देण्यात आली आहे.
महापालिका पाणीपुरवठा विभागांतर्गत भामा आसखेड प्रकल्पाचे कामकाज सुरू आहे. या प्रकल्पाचे कामकाज गदूवार यांच्याकडे यापूर्वी सुपूर्द करण्यात आले होते. गवार यांच्याकडे फ स्थापत्य विभागाचे कामकाजही सोपवलेले आहे. त्यामुळे त्यांना भामा आसखेड प्रकल्पाचे कामकाज पूर्णवेळ करणे शक्य नसल्याने त्यांच्याकडील या कामाची जबाबदारी काढून घेण्यात आली आहे.
त्यांच्याऐवजी फ क्षेत्रीय पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता दीपक पाटील यांच्याकडे अतिरिक्त पदभाराद्वारे भामा आसखेड प्रकल्पाच्या कामाची जबाबदारी देण्यात आली आहे. विभागप्रमुखांनी केलेली शिफारस विचारात घेऊन आयुक्तांच्या मान्यतेने उप आयुक्त विठ्ठल जोशी (सामान्य प्रशासन विभाग) यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत.












