न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ फेब्रुवारी २०२३) :- पत्नीने स्वयंपाक केला नाही; या कारणावरुन आरोपी पतीने त्यांना मारहाण केली. त्यावरून पत्नी माहेरी निघुन गेली. तिला घेवुन येण्यासाठी फिर्यादी हे सासरी गेले. त्यावेळी फिर्यादीचा आरोपी मेव्हणा याच्यासह दोघा आरोपी यांनी फिर्यादीस शिवीगाळ केली. फिर्यादीने शिवीगाळ का करता याबाबत विचारणा केली. याचा राग आल्याने फिर्यादीला आरोपींनी हाताने व डोक्यात कोयता मारुन फिर्यादीला जखमी केले, असे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना (दि. १९) रोजी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास सिध्दार्थनगर, दापोडी येथे घडली. भोसरी पोलिसांनी १६०/२०२३ भा.द.वि. कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी सचिन एकनाथ वाघमारे (वय ३२ वर्ष, धंदा रिक्षाचालक, रा. सांस्कृतीक भवन समोर, सिध्दार्थनगर, दापोडी) यांनी आरोपी नागनाथ शंकर कांबळे (वय ५० वर्षे), राकेश नागनाथ कांबळे (वय ३२ वर्षे, दोघे राहणार सिध्दार्थनगर दापोडी) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.












