न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ फेब्रुवारी २०२३) :- राहत्या घरात आरोपी बळजबरीने घुसला. ‘तू तुझ्या बहिणीपेक्षा खूप सेक्सी दिसते’, असे म्हणत फिर्यादीच्या मनास लज्जा वाटेल असे बोलला. तुझे दुसऱ्याबरोबर संबंध आहेत, असे म्हणत मला फियादी सोबत आरोपीने अश्लील हरकत केली. फिर्यादीने जोरात त्यास ढकलले. त्यावेळी ‘तुला मारतो, येथे तुला राहू देणार नाही’, अशी धमकी फिर्यादीला दिली. घरासमोर पडलेला दगड हातात घेऊन फिर्यादीच्या डाव्या खांद्यावर, हाताच्या तळहातावर, दगडाने मारून त्यांना जखमी केले. त्यावेळी फिर्यादीचे वडील रतन माधव गिरी हे तेथे आले. त्यांनी त्यास मारू नको असे म्हटले. आरोपीने वडिलांची गची हाताने पकडून जोरात हाताने धक्का मारला व घरातील लोखंडी रॉड व सामान ढकलून देऊन खाली पाडून त्याचे नुकसान केले, असे फिर्यादीत नमूद आहे.
हा प्रकार (दि. १९) रोजी रात्री ९.४५ वाजता नाणेकरवाडी, चाकण येथे घडला.
फिर्यादी महिलेने आरोपी विजय मोहन राठोड (वय ३२ वर्ष, रा. खराबवाडी, चाकण) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. चाकण पोलिसांनी २३०/२०२३ भादंवि क ५०९, ३५४, ४५२, ३२४, ४२७, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करीत आरोपीला अटक केली आहे.












