न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ फेब्रुवारी २०२३) :- स्टार पुंट कंपनीचे प्रतिनिधी असल्याचे आरोपी दोघांनी भासवले. या कंपनीमध्ये गुंतवणूक केल्यास आकर्षक परतावा देण्याचे आमिष फिर्यादीला दाखवले. एनी डेस्क नावाचे स्क्रिन शेअरिंग अॅप्लीकेशनद्वारे व संगणकीय साधनांद्वारे फिर्यादीकडून एकूण ७,५०,००० रुपये रक्कम काढून घेतली. फिर्यादी यांना कोणताही परतावा / रिटर्नसन देता मूळ मूद्दल रक्कम स्वतःच्या फायदयासाठी फिर्यादीची फसवणूक केली, असे फिर्यादीत नमूद आहे.
हा प्रकार (दि. १८/०८/२०२२ पासुन ते आज रोजी दरम्यान संगणकिय साधनाद्वारे, फिर्यादी घरी असताना घडला.
फिर्यादी शंकर फगुनी मुखिआ (वय ३७ वर्ष, धंदा नोकरी, रा.सर्वे क २३२ / १ खंडोबा माळ, भोसरी) यांनी आरोपी सोनू कुमार रमणजी झा (वय २३ वर्ष, रा. अहमादा, राघुनी देहात, मधुबनी बिहार, starpunt000@gmail.com मेल आय डी चा वापरकर्ता, मोबाईल क्रमांक (९२१९०७०१०७ आणि ९९९९३ ८८८ ८८) चा वापरकर्ता यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
भोसरी पोलिसांनी १६९/२०२३. कलम ४०६, ४१९, ४२० भा.दं.वि. सह कलम ६६ (सी), ६६ (डी) माहिती तंत्रज्ञान अधिनीयम प्रमाणे आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
















