न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ फेब्रुवारी २०२३) :- ताथवडे चौकाकडुन अॅक्टीवा (एमएच१४जेजी५३७१) वरून फिर्यादी यांचे वडील डांगे चौकाकडे जात होते. त्यावेळी डाव्या बाजुने जाणाऱ्या अज्ञात कार चालकाने अविचाराने, हयगयीने भरधाव वेगाने कार चालवुन फिर्यादीच्या वडीलांच्या दुचाकीला डाव्या बाजुने धडक दिली. त्यात त्यांच्या डोक्यास व डाव्या पायाच्या खुब्यास जखम झाली.
अपघात करून गाडीच्या नुकसानीस आरोपी कारणीभूत झाला आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे. हा प्रकार (दि. २०) रोजी दुपारी २.२५ वाजेच्या सुमारास ताथवडे चौकातील डांगे चौकाच्या बाजुस जाणाऱ्या रस्त्यावर, ताथवडे, वाकड येथे घडला.
फिर्यादी रनवीर सिंग परमजीत सिंग भाटीया (वय ४० वर्षे, धंदा व्यवसाय, रा. रजनिगंधा अपार्टमेंट, प्लॉट नं.७, फ्लॅट नं. ५. अशोक टॉकीजजवळ, पिंपरी यांनी आरोपी अज्ञात कारचालकाच्या विरोधात फिर्याद दिली आहे. वाकड पोलिसांनी आरोपी विरोधात १५७/२०२३ भा.दं.वि. कलम २७९, ३३७,४२७ मो.वा.का. कलम १८४, ११९/१७७, १३२ (१) (क) नुसार गुन्हा दाखल केला आहे.
















