न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ फेब्रुवारी २०२३) :- उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेनेचे शहरप्रमुख सचिन भोसले यांच्यासह आणखी एकावर चिंचवडमधील डांगे चौकातील मंगलनगर येथे सायंकाळी हल्ला झाला. महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांचा प्रचार करीत असताना हा प्रकार घडला आहे.
घटनास्थळी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पाषाणकर आणि भोसले कार्यकर्त्यांसह प्रचार करीत होते. सायंकाळच्या सुमारास काहीजण तेथे आले. त्यांनी दोघांवर अज्ञात वस्तूने हल्ला केला.
सचिन भोसले यांच्या हाताला दुखापत झाली असून पाषणकर यांचा पाय मोडला असल्याची माहिती मिळतेय. दोघांनाही उपचारासाठी बाणेर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हल्ल्याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
















