न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ फेब्रुवारी २०२३) :- वंचित बहुजन विकास आघाडीचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र तायडे यांच्यासह संपूर्ण कार्यकारणी सदस्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. ‘वंचित’ ही भाजपाची ‘बी’ टीम बनली असून देशातील लोकशाही वाचवायची असेल तर भाजपला हद्दपार करावे लागेल. त्यामुळे आपण वंचितमधून बाहेर पडत असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले.
यावेळी ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यासह चिंचवड विधानसभा निरीक्षक सुनील आण्णा शेळके, शहराध्यक्ष अजित गव्हाणे, मराठवाडा विकास संस्थेचे अरुण पवार आदी उपस्थित होते.
वंचित बहुजन विकास आघाडीने भाजपला पूरक ठरणारी भूमिका चिंचवड मतदार संघात घेतल्याने कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. लोकशाहीच्या रक्षणासाठी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहलेल्या संविधानाच्या रक्षणासाठी समविचारी असणाऱ्या महाविकास आघाडीसोबत असणे आवश्यक असल्याचे सर्वच कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. आपल्यातील मतांची विभागणी ही भाजपच्या पथ्यावर पडणारी ठरत आहे. चिंचवडच्या पोटनिवडणुकीत ही विभागणी आम्ही टाळणार आहोत. आपली एकी भाजपचा पराभव नक्की करू शकते. त्यामुळे कोणत्याही भूलथापांना बळी न पडता वंचित घटकाने महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांना साथ द्यावी, असे आवाहन तायडे यांनी यावेळी केले.
















