न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ फेब्रुवारी २०२३) :- १०० वर्षापेक्षा जास्त इतिहास असलेल्या वडगाव मावळ वकील बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी अॅड. संजय वांद्रे तर उपाध्यक्षपदी अॅड. चंद्रकांत खांदवे यांची निवड करण्यात आली आहे. सन २०२३-२४ या कालावधीसाठी कार्यकारिणीची निवड करण्यात आली.
वडगाव मावळ न्यायालयातील बार रूममध्ये बोलाविलेल्या बैठकित एकमताने अध्यक्षपदी वांद्रे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. बैठकीत जेष्ठ विधीज्ञ रवींद्र दाभाडे, राजेंद्र गाडे पाटील, तुकाराम काटे, प्रताप शेलार, मछिंद्र घोजगे, विठ्ठल पिंपळे, राजेंद्र भंडारी, रवींद्र यादव, पांडुरंग काळे, संग्राम भेगडे, अॅड. अशोक ढोरे, सदाशिव शिंदे, अविनाश पवार, जयश्री शितोळे यांच्यासह अनेक वकील उपस्थित होते.
या वेळी जेष्ठ विधिज्ञ रवींद्र दाभाडे यांनी २०२३- २४ ची कार्यकारिणी जाहीर केली. अध्यक्षपदी अॅड. संजय वांद्रे, उपाध्यक्षपदी अॅड. चंद्रकांत खांदवे, सचिव अॅड. देविदास मराठे, अॅड. सुचेता आंबिकर, खजिनदार अॅड. रुपाली सातकर, सदस्य अॅड. रवींद्र विनोदे, अॅड. समीर खांदवे, अॅड. अरविंद गोतारने, अॅड. विकास नवघणे, अॅड. रामदास फुगे, अॅड. मृणाल टिळेकर, अॅड. सुरेखा ढोरे जोरी, अॅड. अमृता पवार, अॅड. अपूर्वा गिरमे यांची निवड करण्यात आली आहे.
वडगाव मावळ येथे नवीन सुसज्ज अशी न्यायालयीन इमारत करण्यासाठी पाठपुरावा करणार असून वकिलांच्या न्याय हक्कासाठी सदैव प्रयत्नशील असणार असल्याचे अॅड. वांद्रे यांनी सांगितले. तसेच पुढील काही दिवसातच अतिरिक्त जिल्हा न्यायालय, वडगाव मावळ येथील न्यायालयात येणार असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.
अॅड. राजेंद्र गाडे पाटील व अॅड. मच्छिन्द्र घोजगे यांनी नवीन कार्यकारिणीला शुभेच्छा देत उपस्थितांचे आभार मानले.


















