- लग्नाचे आमिष दाखवीत सबंध ठेवले; आर्थिक फसवणूकही केली…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ फेब्रुवारी २०२३) :- शादी डॉट कॉम या साईडवरुन आरोपीने फिर्यादीशी ओळख केली. स्वतः इंडीयन ऑईल अॅण्ड नॅचरल गॅस रिसोर्समध्ये नोकरी करीत असल्याचे भासवून फिर्यादीचा विश्वास संपादन केला. लग्नाच्या अमिषाने वारंवार शरिरसंबंध ठेवुन लग्नास नकार दिला. तसेच फिर्यादीच्या परिचयाचे अभिजीत मदने यांनी कमी किंमतीत गाड्या मिळवुन देण्याच्या बहाण्याने ७,५०,००० रुपये घेवुन फिर्यादीची फसवणुक केली, असे फिर्यादीत नमूद आहे.
ही घटना (दि. १६/०९/२०२२ ते दिनांक २७/११/२०२२) दरम्यान हॉटेल रिगल इन, मोरवाडी, पिंपरी तसेच मोरवाडी, पिंपरी येथील इतर हॉटेलमध्ये (नाव आठवत नाही) घडली.
महिला फिर्यादीने आरोपी रुपेश शालीग्राम धुरई (वय- ३८ वर्षे, रा. फ्लॅट नं ३०२, कमल क्रिस्ट अपार्टमेंट, हुकेश्वर रोड, कलावती नगर, नागपुर) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. पिंपरी पोलिसांनी २२५/२०२३ भा. दं. वि. संहिता कलम ३७६ (२) (एन), ४२० प्रमाणे आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.












