न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ फेब्रुवारी २०२३) :- फेसबुक सोशल मिडीयावर आरोपीने फिर्यादीविषयी अश्लील कमेंट प्रसारीत केली. त्यांच्या मनास लज्जा निर्माण झाली. विनयभंग केला. हा प्रकार (दि. २१) रोजी सायंकाळी ७.०० वाजता सी/ओ अमर देशमुख, एफ, २०३, ग्रीन सोसा. बाणेर येथे घडला.
महिला फिर्यादीने आरोपी देवेंद्र जोडमोटे (रा. भारतमाता नगर, मझरेवाडी, एअरपोर्टजवळ, खोटगी रोड, सोलापुर) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. हिंजवडी पोलिसांनी आरोपीच्या विरोधात १४४/२०२३ भादवी कलम ५०९ माहीती तंत्रज्ञान अधिनियम ६७ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.












