न्यूज पीसीएमसी नेटवर्क
(पिंपरी दि. २४ फेब्रुवारी २०२३) :- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहर प्रमुख अॅड. सचिन भोसले यांच्यावर हल्ला करण्यात आला. याप्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात दोघांनीही परस्पर विरोधात गुन्हे दाखल केले आहेत.
जयदीप संपत माने (वय ४०), आकाश हेगडे (वय ३१), सनी चव्हाण (वय २३), करण अहीर (वय (२५), अक्षय कास्तार (वय २५, सर्व रा. (वाकड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. यातील आकाश हेगडे आणि सनी चव्हाण यांना पोलिसांनी अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी भोसले हे बुधवारी (दि. २२) सायंकाळी साडेपाच ते सहा या कालावधीत अॅड. सचिन भोसले राष्ट्रवादीच्या उ मेदवाराचा प्रचार करीत असल्याचा राग मनात धरून भाजपचे कार्यकर्ते जयदीप माने, आकाश हेगडे, सनी चव्हाण, करण अहीर, अक्षय कास्तार यांनी संगनमताने फिर्यादी भोसले यांचा रस्ता अडवला. त्यावेळी बाजूला सरण्यास हात केल्याच्या कारणावरून आरोपींनी फिर्यादीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच फिर्यादी भोसले यांच्या सोबतचे कार्यकर्ते गोरक्षनाथ पाषाणकर यांनाही दुखापत केली.
याच्या परस्पर विरोधात आकाश बापू हेगडे (वय ३१, रा. थेरगाव) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार सचिन भोसले, त्यांची पत्नी, मुलगा, चुलती तसेच भोसले यांचा बॉडीगार्ड व त्यांचे पाच ते सहा कार्यकर्ते यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी व त्यांचे मित्र बुधवारी थेरगाव येथे असताना सचिन भोसले हे त्यांच्या कार्यकत्यांसह आले. त्यांनी फिर्यादीला त्यांच्या प्रचाराचा साऊंडचा आवाज का कमी करायला सांगितला, असे म्हणून फिर्यादीला शिवीगाळ करून मारहाण केली. यात फिर्यादी जखमी झाले.
















