- सव्वातीन लाखांचे स्टील जप्त; पाच जणांचे टाळके गजाआड…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ फेब्रुवारी २०२३) :- चाकण एमआयडीसीतील कंपनीत रात्रीच्या वेळी पडलेल्या दरोडयातील गुन्ह्याची चाकण पोलीसांनी उकल केली आहे. पाच आरोपींना अटक करून त्यांच्याकडून ३,३६,३०० रूपयांचा मुददेमाल जप्त केला आहे.
दिलनवाज मोहंमद शफी खान (वय ५४, रा. दावडमळा, चाकण), मोहंमद हनिफ मोहंमद शफी शेख (वय ३२ वर्षे), रिझवान अहमद अबुसामा चौधरी (वय २२ वर्षे), जसरूददीन वसीउददीन चौधरी (वय २३ वर्षे), दिपक युवरा सुरवाडे (वय २३ वर्षे, सर्व रा. शिळफाटा, मुंब्रा, ठाणे) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, (दि. १७) रोजी फिर्यादी गोरक्षनाथ गोविंद गायकवाड (वय ३६, धंदा नोकरी, रा. कुरूळी ता. खेड) यांनी चाकण पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली होती. पहाटे २.०० वाजेच्या सुमारास चाकण येथील दावड मळ्यातील टेक्नोड्राय सिस्टम इंजिनिअरींग प्रा.लि. या कंपनीमध्ये पाच ते सहा अनोळखी इसमांनी कंपनीत प्रवेश केला. कंपनीतील सिक्युरीटी गार्ड दिलनवाज मोहंमद खान याला धमकी देवून चाकुचा धाक दाखवुन तसेच दुसरा सिक्युरीटी गार्ड नामदेव मरिंबा भोगे याला लोखंडी रॉडने मारण्याची धमकी देवुन त्याचे हातपाय दोरीने बांधुन कंपनीतील स्टेनलेस स्टिल व माईल्ड स्टिल एकुण ८०० किलो स्क्रॅप सुमारे ९१,३०० रुपये किंमतीचा मुददेमाल छोटा हत्ती टॅम्पोमध्ये भरून दरोडा टाकुन चोरून नेला होता. या तक्रारीवरून चाकण पोलीस स्टेशन येथे गुरनं २२४ / २०२३ भादवि कलम ३९५ प्रमाणे पाच ते सहा अज्ञात आरोपी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता.
चाकण पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वैभव शिंगारे यांनी चाकण पोलीस स्टेशनकडील डि. बी. पथकाचे अधिकारी व अमंलदार यांना सदर गुन्हयातील आरोपींचा शोध घेण्याबाबत सुचना व मार्गदर्शन केले. तसेच अनिल देवडे, पोलीस निरीक्षक गुन्हे यांनी व डि. बी. पथकाने सदर कंपनीतील सिक्युरीटी गार्ड यांच्याकडे चौकशी सुरू केली. कंपनीतील सीसीटीव्ही तपासातुन त्यामध्ये समोर आलेल्या बाबी तसेच कंपनीतील सिक्युरीटी गार्ड दिलनवाज खान याचेकडे चौकशी करत असताना तो सांगत असलेल्या माहितीमध्ये वारंवार तफावत असल्याने त्यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने व त्याचे सहकारी अन्दर अली, मोहंमद हनिफ मोहंमद शफी शेख, रिझवान अहमद अबुसामा चौधरी, जसरूददीन वसीउददीन चौधरी, दिपक युवरा सुखाडे यांच्यासोबत मिळुन नियोजनबध्द कट रचला. अटक आरोपींकडुन गुन्हयातील चोरी केलेला स्टेनलेस स्टिल व माईल्ड स्टिल एकुण ८०० किलो स्क्रॅप सुमारे २१,३०० रू किंमतीचा गुन्हयातील चोरी गेलेला सर्व मुददेमाल तसेच गुन्हयात वापरलेला छोटा हत्ती टेम्पो (एमएच०३सीव्हि४३२६) व आरोपीने गुन्हयात वापरलेले मोबाईल फोन असा एकुण ३,३६,३०० रूपये किंमतीचा मुददेमाल जप्त केलेला आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त संजय शिंदे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ- १ विवेक पाटील, सहा. पोलीस आयुक्त, प्रेरणा कट्टे यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैभव शिंगारे तसेच पोलीस निरीक्षक (गुन्हे) अनिल देवडे, तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक प्रसंन्न जराड, विक्रम गायकवाड, सुरेश हिंगे, पो हवा राजु जाधव, संदिप सोनवणे, पोना हनुमंत कांबळे, निखिल शेटे, भैरोबा यादव, मपोना भाग्यश्री जमदाडे, पोकॉ / नितीन गुंजाळ, निखील वर्पे, अशोक दिवटे, प्रदिप राळे, सुनिल भागवत, चेतन गायकर यांनी केली आहे. गुन्हयाचा पुढील तपास सपोनि विक्रम गायकवाड हे करीत आहेत.
















