न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ फेब्रुवारी २०२३) :- पिंपरी-चिंचवड काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष तथा प्रदेश सचिव सचिन साठे यांनी गुरूवारी (दि. २३) रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.
सचिन साठे यांनी प्रदेश सचिवपदासह काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा नुकताच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे दिला होता. अश्विनी लक्ष्मण जगताप यांच्या प्रचारार्थ सांगवीतील पीडब्ल्यूडी मैदानावर सभा झाली. त्यावेळी त्यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला. त्यामुळे कॉंग्रेसला मोठा धक्का बसला असून त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांचाही भाजपमध्ये प्रवेश होईल, अशी शक्यता आहे. त्यामुळे भाजपचे पारडे जड होणार आहे.
यावेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजप-शिवसेना महायुतीच्या उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप, पालकमंत्री चंद्रकांत पाटील आदी उपस्थित होते.
















