न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ फेब्रुवारी २०२३) :- लग्नाचे खोटे आमिष दाखवले. फिर्यादीच्या मुलांना मारण्याची धमकी दिली. फिर्यादीला शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली. आरोपीने फिर्यादीसोबत वेगवेगळ्या ठिकाणी तिच्या इच्छेविरुध्द बळजबरीने शारीरिक संबंध निर्माण करुन फिर्यादीशी लग्न न करता दुसरीकडे लग्न केले, असे फिर्यादीत नमूद आहे.
हा प्रकार सन २०२१ ते २२/०२/२०२३ पर्यंत शिवशक्ती कॉलनी, शंकराचे मंदीराजवळ, चिंचवडे नगर, सुदर्शन कॉलनी नं ६, वाकड आणि खेड शिवापुर येथील एका लॉजवर तसेच आहेर यांचे भाडेकरु चिंतामणी चौक, वाल्हेकरवाडी येथे घडला.
महिला फिर्यादीने आरोपी वैभव मनोहर मोरे (रा. बाळु मामा निवास, शिवशक्ती कॉलनी, शंकराचे मंदीराजवळ, चिंचवडेनगर) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. चिंचवड पोलिसांनी ९६/२०२३ भा.दं.वि. कलम ३७६, ३७६ (२) (N), ४१७, ३२३, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.















