न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ फेब्रुवारी २०२३) :- पायी रस्ता क्रॉस करीत असताना अज्ञात वाहन चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने चालवले. फिर्यादीच्या आईस जोरात धडक दिली. अपघातात त्या गंभीर जखमी झाल्या. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. आरोपी वाहनचालक अपघातस्थळी न थांबता पळुन गेला. त्यांच्या मृत्यूस आरोपी कारणीभूत ठरला, असे फिर्यादीत म्हटले आहे.
शांता हनुमंत जाधव (वय ६०, रा. कमला नेहरु शाळेजवळ, साईबाबानगर चिंचवड स्टेशन, चिंचवड) असे मयत महिलेचे नाव आहे. हा अपघात (दि. २३) रोजी सायंकाळी ५.२० च्या सुमारास खंडोबा माळ चौक, निगडी येथे घडला.
फिर्यादी सचिन हनुमंत जाधव (वय ३५ वर्षे, व्यवसाय नोकरी, रा. चिंचवड स्टेशन) यांनी आरोपी अज्ञात वाहनावरील अज्ञात चालकाविरोधात फिर्याद दिली आहे. निगडी पोलिसांनी १०७/२०२३ १३२ (१) क. ११९/१७७, भा. दं.वि. कलम २७९, ३३८, ३०४ (अ), मोटर वाहन कायदा कलम १८४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरु आहे.


















