न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ फेब्रुवारी २०२३) :- किरकोळ कारणावरुन पिडीत पत्नीला आरोपी पतीने वारंवार शिवीगाळ करुन मारहाण करीत मानसिक व शारीरीक त्रास दिला. तसेच कोणाला काही सांगितले तर ‘तुला जिवंत सोडणार नाही’ अशी धमकी दिली. आरोपीच्या त्रासाला कंटाळुन फिर्यादीच्या मुलीने गळफास घेवुन आत्महत्या केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना (दि. २९/१०/२०२० ते दि. २३/०२/२०२३) आयशा मसजीद जवळ, विद्यानगर, चिंचवड येथे घडली. फिर्यादी महिलेने आरोपी विराज अजय चितारे (वय २४ वर्षे, रा. महिंद्रा शोरुम मागे, दत्तनगर रामनगर, चिंचवड) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
पिंपरी पोलिसांनी आरोपी विरोधात २४४/२०२३ भा.दं.वि. कलम ३०६, ३२३, ५०४,५०६ नुसार गुन्हा दाखल करीत त्याला अटक केली आहे.












